प्रतिनिधी /पणजी
आरोग्य, व्यायामाच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आरजी हॉस्पिटलतर्फे पणजीत नुकतेच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 3500हून अधिक सहभागी झाले होते. या मॅरेथॉन शर्यतीचे उद्घाटन मॉडेल मिलिंद सोमण यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना उपस्थित होते.
रन फॉर हेल्थ ही मॅरेथॉनची थीम होती. सदर मॅरेथॉन गोवा विद्यापीठाच्या मैदानापासून सुरू झाली. या मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, युवावर्ग आणि क्रीडा व्यक्तींसह विविध प्रांतातील 3500हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. 21 किमी धावण्याच्या शर्यतीत श्रीनु बुघटा, 10 किमी धावण्याच्या शर्यतीत सुशांत जेधे आणि 5 किमी अंतराच्या धावण्याच्या शर्यतीत तनुज ठाकूर यांनी बाजी मारली. या कार्यक्रमासाठी आरजी हॉस्पिटलचे डॉ. मारझूक, डॉ. सचिन, डॉ. लेंगडे, डॉ. सिंधू, आणि डॉ. तेजस कामत उपस्थित होते. यामध्ये सिंधू मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. वर्कआऊट झुंबा डान्सचे आयोजन विल्मा ब्रिटो आणि टीमने केले होते.
यावेळी मिलिंद सोमण यांनी आरजी हॉस्पिटलचे अभिनंदन केले आणि तरूणांना जबाबदार बनून आरोग्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.