वृत्तसंस्था/ म्युनिच (जर्मनी)
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील बेव्हेरियन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत डेन्मार्कच्या होल्गर रूनेने एकेरीचे जेतेपद पटकाविले. एटीपी टूरवरील स्पर्धेतील रूनेचे हे पहिले जेतेपद आहे.
रविवारी होल्गर रूने आणि हॉलंडचा बोटिक व्हॅन डे झेंडस्कल्प यांच्यात एकेरीचा अंतिम सामना खेळविण्यात आला. या लढतीतील पहिल्या सेटमध्ये झेंडस्कल्प 4-3 असा आघाडीवर होता पण त्यानंतर त्याला छातीत अचानक वेदना होवू लागल्याने त्याने हा सामना अर्धवट सोडला. या दोन्ही टेनिसपटूंना या स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. 19 वर्षीय रूने हा या स्पर्धेतील जेतेपद मिळविणारा तिसऱया क्रमांकाचा तरूण टेनिसपटू आहे. डेन्मार्कच्या रूनेने या स्पर्धेत दुसऱया फेरीत जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हला पराभवाचा धक्का दिला होता.