वृत्तसंस्था / मिलान (इटली)
इंटर मिलान फुटबॉल क्लबने सिरी ए फुटबॉल स्पर्धेत जेतेपदासाठी आपले आव्हान जिवंत राखले आहे. या स्पर्धेतील गुरूवारी झालेल्या सामन्यात इंटर मिलान संघाने इंपोली संघाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
स्पर्धेच्या गुणतक्त्यात इंटर मिलान आणि एसी मिलान यांच्यात चुरस असून आता इंटर मिलानने एसी मिलानला मागे टाकले आहे. गुरूवारी झालेल्या या सामन्याला 70 हजार फुटबॉल शौकिन उपस्थितीत होते. या विजयामुळे इंटर मिलान संघाला तीन गुण मिळाले. इंटर मिलान संघातर्फे मार्टिनेझने दोन गोल तर ऍलेक्सीस सांचेझने एक गोल केला. इंपोलीतर्फे इंटर मिलानला एक बोनस गुण मिळाला.