Tarun Bharat

ग्रॅण्डमास्टर पी.इनियनला उपविजेतेपद

Advertisements

वृत्तसंस्था/ ला प्लान (फ्रान्स)

फ्रान्समध्ये झालेल्या 2022 ला प्लान आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा नवोदित 19 वर्षीय ग्रॅण्डमास्टर पी. इनियनने 7 गुणासह दुसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत युक्रेनच्या ग्रॅण्डमास्टर विताली सिव्हुकने विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेत भारताच्या इनियनने 9 फेऱयातून 7 गुणासह युक्रेनच्या सिव्हुकसमवेत संयुक्त आघाडीचे स्थान मिळविले होते. पण सरस टायब्रेक गुणांकाच्या आधारे सिव्हुकने जेतेपद हस्तगत केले. या स्पर्धेत भारताचा एस. दासने 6.5 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. या संपूर्ण स्पर्धेत इनियनने 9 फेऱयांमध्ये एकही पराभव पत्करला नाही. त्याने 5 डाव जिंकले तर 4 डाव अनिर्णित राखले. या स्पर्धेतील सहाव्या फेरीतील सिव्हुक आणि इनियन यांच्यातील डाव बरोबरीत राहिला होता. या स्पर्धेमध्ये 19 देशांच्या 95 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता.

Related Stories

देशभरात ऑनलाईन क्लासेसची चलती : माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन

Patil_p

भारताचा इंग्लंडवर 7 गडय़ांनी दणदणीत विजय

Patil_p

राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्सचा धुव्वा

Patil_p

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

Patil_p

गॅले ग्लॅडिएटर्सची विजयी सलामी

Patil_p

सराव स्पर्धेत अँडी मरे खेळणार

Patil_p
error: Content is protected !!