वृत्तसंस्था/ कॅली (कोलंबिया)
20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्तर प्रदेशातील शेतकऱयाची कन्या असलेल्या रुपल चौधरीने दोन पदकांची कमाई करत नवा इतिहास घडविला. या स्पर्धेत दोन पदके मिळविणारी रुपाली ही भारताची पहिली ऍथलिट आहे.
उत्तरप्रदेशच्या मिरत जिल्हय़ातील शाहपूर ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रुपलने 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या 4ƒ400 मी. रिलेमध्ये रौप्यपदक तर महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळविले. महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत रुपलने 51.85 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान घेत कास्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात केनियाच्या डेमारीस मुटुंगाने 51.71 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर ब्ा्रिटनच्या येमी जॉनने 51.50 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले.
गुरुवारी या स्पर्धेत महिलांच्या 4ƒ400 मी. रिलेमध्ये भारतीय महिला धावपटूंनी रौप्यपदक मिळविले असून अमेरिकेने सुवर्णपदक घेतले आहे. या स्पर्धेमध्ये भारताने पदकतक्त्यामध्ये एकूण 9 पदकांची कमाई केली आहे. 2021 साली नैरोबीत झालेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने दोन रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदके मिळविली होती. फिनलँडमध्ये 2018 साली झालेल्या या स्पर्धेत भारताची महिला धावपटू हिमा दासने महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळविले होते. 2016 साली पोलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेक धारक नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळविले होते.