ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण आणि मानसिक छळाचा आरोप केला होता. त्यावरुन राजकारण तापले असतानाच शेवाळे यांनी संबंधित महिलेचा दाऊदशी संबंध जोडला. तसेच या महिलेला ठाकरे गट पाठिशी घालत असून, माझा संसार आणि राजकीय आयुष्य खराब करण्याचे हे षढयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील संतप्त झाल्या असून, त्यांनी शेवाळेंना खडेबोल सुनावले.
राहुल शेवाळे स्वत: शेण खातात आणि नंतर त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडतात. शेवाळे यांना असं बोलताना लाज वाटली पाहिजे. त्या महिलेचे दाऊदशी संबंध होते तर शेवाळेंचेही त्या महिलेशी जवळचे संबंध होते. याचा अर्थ शेवाळे यांनी देशाविरोधात काम केले आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंध ठेऊन देशातील अंतर्गत माहिती त्यांना पुरवली, असं म्हणायचं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱया महिलेच्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी सांगितलं.
अधिक वाचा : प्रसिद्ध तेलुगू अभिनेते चलपती राव यांचे निधन
दरम्यान, शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं केलेल्या लैंगिक अत्याचार व मानसिक छळाच्या तक्रारीची दखल घ्यावी व या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.