11 पैशांनी घसरून 77.83 च्या नीचांकी पातळीवर
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये विक्री आणि परदेशातील मजबूत ग्रीनबॅकमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी 11 पैशांनी घसरून 77.83 वर बंद झाला. याचा परिणाम गुंतवणूकदारांवरही झाला आहे. परकीय भांडवलाचा सतत वाढणारा ओघ आणि जागतिक कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे ही घसरण होत असल्याचे फॉरेक्स तज्ञांकडून सांगण्यात आले. आंतरबँक परकीय चलन बाजारात भारतीय रुपयाची किंमत शुक्रवारी सकाळी 77.81 या पातळीवर होती. त्यानंतरच्या सत्रात रुपयाने 77.87 या नवीन विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती.