वार्ताहर / किणये
कर्ले गावचा सुपुत्र रुपेश रामलिंग कुगजी याने नुकत्याच सिंदगी विजापूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. यामुळे त्याची राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी यांच्या वतीने सदर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 57 किलो वजन गटांमध्ये रुपेशने हे यश मिळविले आहे.
रुपेश हा कुडची रायबाग येथील बी शंकरानंद कॉलेजचा विद्यार्थी असून तो बीए द्वितीय वर्षात शिकत आहे.
यापूर्वी त्याने अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये विविध बक्षीचे मिळवले आहेत. त्याला कोच मठपती यांचे मार्गदर्शन लाभत आहे .त्याच्या या यशाबद्दल कर्ले परिसरात त्याचे कौतुक होत आहे.