तरुण भारत

आशिया चषक हॉकी स्पर्धेतून रुपिंदर दुखापतीमुळे बाहेर

वृत्तसंस्था/ बेंगळूर

आगामी होणाऱया आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणारा रुपिंदर पाल सिंगच्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागत आहे. आता या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व वीरेंद्र लाक्राकडे सोपविण्यात आले आहे.

Advertisements

रुपिंदर पाल सिंगने यापूर्वी घेतलेल्या निवृतीच्या निर्णयानंतर त्याने या स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले होते. आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या हॉकी संघाचे सराव शिबीर सुरू असताना रुपिंदर पाल सिंगच्या मनगटाला दुखापत झाल्याची माहिती हॉकी इंडियाने दिली. आता या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 20 जणांच्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व वीरेंद्र लाक्राकडे सोपविण्यात आले असून एस.व्ही.सुनीलकडे उपकर्णधारपद राहील. आशिया चषक हॉकी स्पर्धा 23 मे पासून इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू होणार आहे.

Related Stories

फ्रेंच स्पर्धेतील विजेती स्वायटेक क्वारंटाईनमध्ये

Patil_p

कोव्हिड-19 लढा : देशातील क्रीडा संघटनांचा हातभार

Patil_p

मॅटेव बेरेटिनी, हय़ुबर्ट हुर्काझची उपांत्य फेरीत धडक

Amit Kulkarni

भारतीय फुटबॉल संघ दुबईला रवाना

Patil_p

केन विल्यम्सनच्या शतकाने न्यूझीलंड भक्कम स्थितीत

Patil_p

निसांका, थिरिमने यांची दमदार अर्धशतके

Amit Kulkarni
error: Content is protected !!