Tarun Bharat

ग्रामीण भागाला सक्षम शिक्षणाधिकाऱ्यांची गरज

शैक्षणिक समस्यांचा डोंगर : कामचुकार शिक्षकांवर वचक कोणाचा? तालुक्यात शैक्षणिक दर्जाची घसरण 

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या बेळगावमध्ये शैक्षणिक समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. बेळगाव ग्रामीण गटशिक्षणाधिकारी पदावर सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक होत नसल्याने तालुक्यातील अनेक शाळांमधील शिक्षक कामचुकारपणा करीत आहेत. प्रशिक्षण व इतर कामांच्या नावाखाली शिक्षक भटकताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांवर वचक कोण आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत आहे. यामुळे सरकारी शाळांमधील पटसंख्या कमालीची कमी झाली असून, खासगी शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा आहे. असे असताना दुसरीकडे मात्र सक्षम गटशिक्षणाधिकारी मिळत नसल्याने बेळगाव तालुक्यातील शैक्षणिक दर्जा घसरत आहे. याकडे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाचेही दुर्लक्ष होत असल्याने कामचुकार शिक्षकांचे फावले आहे.

यापूर्वी चव्हाट गल्ली येथील शाळा क्र. 5 येथे असणारे ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालय गणपत गल्ली येथील शाळा क्र. 2 मध्ये मागील वर्षी हलविण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारित 21 सरकारी हायस्कूल, 58 अनुदानीत हायस्कूल, 26 विना अनुदानीत हायस्कूल, 283 सरकारी प्राथमिक शाळा, 6 अनुदानीत प्राथमिक शाळा, 42 विनाअनुदानीत प्राथमिक शाळा अशा 400 हून अधिक शैक्षणिक शाळा येतात.

या विभागात 1600 हून अधिक शिक्षक आहेत. मराठी, कन्नड व उर्दु या तिन्ही माध्यमांच्या शाळा विभागात आहेत. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच प्रशासकीय समस्या, प्रश्नपत्रिकांचे नियोजन, विविध परिपत्रके काढणे, शिक्षकांच्या समस्या सोडविणे, सरकारच्या आदेशाचे पालन करणे, प्रतिभा कारंजी यासह विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, सहलीला मंजुरी देणे यासह विविध कामे या विभागामार्फत करावी लागतात.

मुलांचे शैक्षणिक नुकसान

ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत बेळगाव दक्षिण, ग्रामीण व उत्तर या तिन्ही मतदार संघांतील शाळांचा समावेश होतो. प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण 443 शाळा गटशिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत येत असल्यामुळे या ठिकाणी सक्षम शिक्षणाधिकाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे. असे असताना मागील काही वर्षात सक्षम अधिकारी न मिळाल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

Related Stories

जुन्या कार्यालयातील घटनेचा मनपा नोकर संघटनेकडून निषेध

Patil_p

म. ए समितीच्या वतीने जागृती दिंडीच्या पत्रकाचे अनावरण

Rohit Salunke

वकिलांच्या ‘त्या’ ठरावाला मनाई नाही

Patil_p

बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाचा 8 गडय़ांनी विजय

Amit Kulkarni

दक्षिणमुखी मारुतीला कोरोना दूर करण्यांसाठी गाऱहाणे

Amit Kulkarni

सरकार गांधीनगर, अक्षत स्पोर्ट्स संघ विजयी

Amit Kulkarni