आधारकार्डनुसार प्रत्येकी 50 किलो वितरण
वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्मयात होत असलेली खताची टंचाई लक्षात घेऊन नंदगड मार्केटिंग सोसायटीच्यावतीने प्रत्येक शेतकऱयाला युरियाचे एक पोते देण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खत घेण्यासाठी बुधवारी मार्केटिंग सोसायटी कार्यालयात शेतकऱयांनी गर्दी केली होती.
तालुक्मयातील खत दुकानदार निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम घेऊन खताची विक्री करत आहेत. दुकानदारांकडून करण्यात येणारी शेतकऱयांची लूट पाहून तालुका मार्केटिंग सोसायटीने खताची विक्री करावी, अशी मागणी शेतकऱयांतून होत होती. याची दखल नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या व्यवस्थापनाने घेतली. त्याला साहाय्यक कृषी संचालक डी. बी. चव्हाण यांची साथ मिळाली. आवश्यकतेनुसार यापुढेही उपलब्ध साठय़ानुसार शेतकऱयांना खत देण्यात येणार असल्याचे मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन श्रीशैल माटोळी व व्यवस्थापक अभय पाटील यांनी सांगितले.