प्रतिनिधी/ बेळगाव
श्रावण सोमवार आणि 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. विविध साहित्याबरोबर झेंडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. श्रावण सोमवारनिमित्त फळे-हार, फुले आणि इतर पूजेच्या साहित्यांची मागणी वाढली होती.
श्रावण मासात विशेषतः फळांची-फुलांची मागणी अधिक असते. दरम्यान, धार्मिक कार्यक्रम आणि पूजा-अर्चाचे आयोजन केले जाते. त्यामुळे पूजेच्या साहित्याची रेलचेल पहायला मिळाली. शिवाय श्रावण सोमवारनिमित्त उपवास करणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली होती. त्यामुळे 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी झालेली पहायला मिळाली. विशेषतः महिला वर्गाचा फळे-हार, फुले व इतर पूजेचे साहित्य खरेदीकडे कल होता. तर सोमवारी आझादी का अमृतमहोत्सव असल्याने झेंडे आणि पांढरे कपडे व टोप्यांना मागणी वाढली होती.
रविवारी दिवसभर पावसानेदेखील उसंत घेतली होती. शिवाय सुटीचा दिवस असल्याने बाजारात नागरिकांची वर्दळ वाढली होती.
आझादी का अमृतमहोत्सव शहरात आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे विविध साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली होती