Tarun Bharat

मारिउपोलवर संपूर्ण नियंत्रणाचा रशियाचा दावा

वृत्तसंस्था/ पोकरोव्हस्क

काही दिवसांच्या अंतरानंतर रशियाने पुन्हा एकदा युपेनविरोधात हल्लेखोर पवित्रा घेतला आहे. शनिवारी रशियाकडून युपेनच्या काही महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. दक्षिण युपेनमधील मारिउपोल हे बंदर पूर्णतः रशियाच्या ताब्यात आले आहे, असे त्या देशाच्या सेनाप्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

Advertisements

गेल्या तीन महिन्यांपासून रशियाने युपेनची कोंडी केली आहे. मारिउपोल हे युपेनसाठी महत्त्वाचे असणारे बंदर ताब्यात घेण्यासाठी रशियाने अडीच महिन्यांहून अधिक काळ प्रयत्न चालविलेले होते. मारिउपोलवरील हल्ल्यात आतापर्यंत 20 हजारहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. शनिवारी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोगू यांनी अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांची भेट घेऊन मारिउपोलवर संपूर्ण विजय मिळविल्याची माहिती त्यांना दिली. तथापि, पाश्चिमात्य देशांनी या वृत्तावर विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे. आपली सेना अद्यापही मारिउपोलमध्ये लढत आहे, असा दावा युपेनने केला. रशियाने 2 हजार 439 युपेनियन सैनिकांना ताब्यात घेतले असल्याचाही दावा केला. शुक्रवारी 500 हून अधिक जण ठार झाले.

मारिउपोलमधील पोलाद उत्पादन केंद्र रशियाच्या पूर्णतः ताब्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या केंद्रातील उत्पादन जवळपास थंडावले आहे. त्यामुळे युरोपमध्ये पोलादाची कमतरता निर्माण होण्याची शक्मयता आहे. या उत्पादन केंद्राच्या संरक्षणासाठी युपेनने विशेष व्यवस्था केली होती. या संरक्षक सैनिकांनी युद्धगुन्हे केल्याचा दावाही रशियाने केला असून त्यांच्याविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे रशियाच्या ताब्यात गेलेल्या युपेनच्या सैनिकांच्या जीविताविषयी युरोपातील इतर देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

40 अब्ज डॉलर्सचे साहाय्य

रशियाचा प्रतिकार करण्यासाठी युपेनला 40 अब्ज डॉलर्सचे साहाय्य देण्याचे वचन अमेरिकेने दिले आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स व इतर युरोपियन देशांनी साहाय्यात मोठी वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. हे साहाय्य युपेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रs आणि अन्न तसेच औषधाच्या पुरवठय़ाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या प्रभावी शस्त्रास्त्रांसमोर रशियाच्या शस्त्रांची मात्रा चाललेली नाही, असा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे.

10 हजार अद्यापही अडकून

मारिउपोलच्या 4 लाख 50 हजार लोकसंख्येपैकी 10 हजार जण अद्यापही या शहरात अडकून पडल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांना संरक्षण देण्याचा दावा रशियाने केला असला तरी त्यांच्या भवितव्याविषयी शंकेचे वातावरण आहे. सातत्याने बॉम्बफेक होत असल्याने असंख्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले असून जखमींची संख्याही वाढत आहे. रशियाकडून जखमींवरील उपचारासंदर्भात अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप युरोपियन देशांनी केला आहे.

शेवट दृष्टीपथात नाही

तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या युपेन युद्धाचा शेवट अद्यापही दृष्टीपथात नसल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ञांनी म्हटले आहे. रशियाने हा प्रति÷sचा प्रश्न बनविल्याने कितीही हानी झाली तरी तो देश माघार घेणार नाही. युपेननेही रशियासमोर नमते न घेण्याचे ठरविल्याने नजीकच्या भविष्यकाळात परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्मयता असल्याची तज्ञांची भावना आहे.

Related Stories

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1.50 लाखांवर

datta jadhav

पाकिस्तान ‘एफएटीएफ’च्या ग्रे यादीत कायम

Amit Kulkarni

युरोप : धोक्याचा संकेत

Patil_p

कॅनडातील हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड

Patil_p

अफगाणिस्तानात सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांची हत्या

datta jadhav

चिमुरडय़ाला नाव नसलेला दुर्लभ आजार

Patil_p
error: Content is protected !!