सात शहरांवर हल्ला : स्वसंरक्षणार्थ लोकांचा बंकरमध्ये आश्रय, हल्ला परतवण्याचा युक्रेनचा प्रयत्न
कीव्ह / वृत्तसंस्था
रशियाने गुरुवारी युक्रेनवर समुद्र आणि आकाशातून 120 क्षेपणास्त्रे डागली. राजधानी कीव्हसह 7 शहरांवर हे हल्ले करण्यात आले. यात 14 वषीय मुलीसह तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न युक्रेनने केला आहे. आम्ही आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने 16 रशियन क्षेपणास्त्रे हवेत नष्ट केली. याशिवाय मोडेसा भागात 21 रशियन क्षेपणास्त्रेही पाडण्यात आली.
रशियाकडून नव्याने करण्यात आलेला क्षेपणास्त्रहल्ला निवासी भागात करण्यात आला. यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. कीव्हव्यतिरिक्त लविव्ह, खार्किव, मायक्लोव्ह, मोडेसा, पोल्टावा आणि जिटोमीर येथेही क्षेपणास्त्रे पडल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक यांनी दिली. यापूर्वी 15 नोव्हेंबरला रशियाने युक्रेनवर 100 क्षेपणास्त्रे डागली होती. यापैकी दोन क्षेपणास्त्रे पोलंडमध्ये पडल्याने बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला रशियाने 70 क्षेपणास्त्रे डागली होती, त्यापैकी युक्रेनने 60 क्षेपणास्त्रे पाडली होती.
युपेनमध्ये रेड अलर्ट
रशियाने क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात कार्यरत ड्रोनचाही वापर करण्यात आल्याचे युपेनच्या वायुसेनेने सांगितले. गुरुवारी सकाळी युपेनच्या अनेक शहरांमध्ये एअर रेड अलर्टही जारी करण्यात आला. हवाई हल्ले थांबेपर्यंत बंकरमध्ये रहा, असे आवाहन कीव्हचे महापौर विटाली क्लित्स्को यांनी नागरिकांना केले आहे. रशियाच्या नव्या हल्ल्यांनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॉवर स्टेशनवरील हल्लादेखील युद्ध गुन्हा मानला जाईल, असे म्हटले आहे.