इराणी ड्रोनने 4 ठिकाणी घडवले स्फोट
किव्ह / वृत्तसंस्था
रशिया आणि युपेनमधील युद्ध पुन्हा एकदा अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचलेले दिसत आहे. रशियाने सोमवारी सकाळी युपेनची राजधानी किव्हवर कामिकाझे ड्रोनने हल्ला केला. चार ठिकाणी करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याचदरम्यान, युपेनच्या लष्कराने 13 तासांत 37 कामिकाझे ड्रोन पाडली आहेत. ओडेसामध्ये सहा आणि मायकोलायव्हमध्ये 9 ड्रोन पाडण्यात आले आहेत. 3 क्रूझ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आल्याचे युक्रेनच्या सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.
रशियन सैन्याने राजधानीमधील शेवचेंकिव्स्की शहरात इराणी बनावटीच्या कामिकाझे ड्रोनद्वारे हल्ला केला. यामध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. यातील एक इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 जण जखमी झाल्याचे युपेन राष्ट्राध्यक्षांचे चीफ ऑफ स्टाफ आंदे येरमाक यांनी सांगितले.
हल्ल्यात वापरण्यात आलेल्या कामिकाझे ड्रोनचे नाव ‘शाहिद-136’ असे आहे. हे ड्रोन इराणचे सर्वात धोकादायक शस्त्र मानले जाते. युपेन युद्धात आपली पकड मजबूत करण्यासाठी रशियन सैन्य इराणी ड्रोनच्या मदतीने हल्ले करत आहे. या इराणी ड्रोनला आत्मघाती ड्रोन असेही म्हणतात. त्याचे वजन 200 किलो आहे. या ड्रोनची रेंज 2,500 कि.मी. आहे. इराणी ड्रोन ‘शाहिद-136’चे लक्ष्य अचूक असून रशिया युपेनच्या रडार यंत्रणांना लक्ष्य करत असल्याचे तज्ञांचे मत आहे.