मारियुपोलवर कब्जा करण्यासह रशियाने आता काळ्य़ा समुद्राच्या 80 टक्के किनारी क्षेत्रावर ताबा मिळविला आहे. यामुळे युक्रेनला आता सागरी मार्गाने व्यापार करणे अवघड ठरणार आहे.
मारियुपोल बंदरावरून युक्रेन स्टील, कोळसा आणि मक्याची आखाती देशांना निर्यात करत होता. मारियुपोलवर कब्जामुळे पुतीन आता रशियन जनतेसमोर याला विजयाच्या स्वरुपात प्रदर्शित करतील, कारण रशियन जनतेचा एक हिस्सा युद्धाला तीव्र विरोध करत आहे, याचमुळे पुतीन यांनी या युद्धाला ‘मुक्ती’ नाव दिले आहे.
मारियुपोलपूर्वी रशियाच्या सैन्याने पूर्व युक्रेनमधील क्रेमिन्ना शहरावर कब्जा केला होता. या शहरात युद्धापूर्वी 18 हजार लोकांचे वास्तव्य होते. तर रशियाने सोमवारी खेसॉन शहरावर नियंत्रण मिळविल्याचा दावा केला आहे.