रशियातील टीव्ही चॅनेलच्या अँकरने स्वतःच्या प्राइम टाइम शोमध्ये युक्रेनला समर्थन केल्याप्रकरणी ब्रिटनवर रशिया आण्विक हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे. रशियात सर्वाधिक पाहिले जाणारे चॅनेल वनचे अँकर दिमित्री किसलीव्ह यांनी रशियाचा अंडरवॉटर ड्रोन पोसीडॉन समुद्रात 1600 फूट उंची लाटा निर्माण करून पूर्ण ब्रिटनला बुडवू शकतो असे म्हटले आहे.
कशाप्रकारे पोसीडॉन ब्रिटनचे अस्तित्व संपवू शकतो हे चॅनेलने एका व्हिडिओत ग्राफिकद्वारे दर्शविले आहे. पोसीडॉनच्या हल्ल्यामुळे केवळ उंच लाटा निर्माण नसून प्रचंड किरणोत्सर्गही निघणार आहे, यामुळे ब्रिटन किरणोत्सर्गी वाळवंटात रुपांतरित होणार असल्याचे किसलीव्ह यांनी म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेला भूभाग ब्रिटनसोबत आयर्लंडचा देखील आहे.
युद्धग्रस्त युक्रेनला अमेरिकेसह ब्रिटननेच सर्वाधिक मदत पुरविली आहे. युद्धादरम्यान युक्रेनची राजधानी कीव्हचा दौरा करणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पहिले विदेशी नेते ठरले होते. त्यांचे अनुकरण मग अन्य देशांच्या नेत्यांनी केले आहे. तसेच ब्रिटनने रशियाच्या विरोधात सर्वात कठोर निर्बंध लादले आहेत.