रशियन सैनिकांनी युपेनमध्ये निरपराध आणि असाहाय्य नागरिकांवर, विशेषतः महिलांवर अनन्वित अत्याचार केले असून त्याचे ठोस पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायाकडे असल्याने रशियाला युद्धगुन्हय़ांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ऍम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे.
रशियाने युपेनच्या नागरी वस्त्यांवर केलेली क्रूर बॉम्बफेक, रशियन सैनिकांनी अनेक युपेनियन नागरिकांच्या केलेल्या हत्या, तसेच त्यांना फासावर लटविण्याचे क्रूर कर्म, महिलांवरील अत्याचार, बालकांशी दुष्कर्म इत्यादी गुन्हय़ांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाविरोधात अभियोग चालविण्यात येतील. या अत्याचारांची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्याखेरीज संस्था स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे महासचिव अँगस कॅलामर्ड यांनी शुक्रवारी केले आहे. रशियन अत्याचारी व्यक्ती कितीही मोठय़ा पदावर असली तरी तिला न्यायासनासमोर खेचले जाईल. ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने रशिया विरोधात मोठय़ा प्रमाणात साक्षी आणि कागदोपत्री पुरावे संकलित केले आहेत. ते सर्व आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर ठेवले जाणार आहेत.
मायलेकरांची ताटातूट
रशियाने आपल्या सैनिकांकडून युपेनमध्ये अनेक कुटुंबांमधील मुले हिरावून घेतली आहेत. ही मायलेकरांची ताटातूट सहन केली जाणार नाही. ऍम्नेस्टी इंटरनॅशनलकडून हरवलेल्या मुलांचा शोध घेतला जात असून यासंबंधातील दोषींवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.