Tarun Bharat

अध्यक्षीय कार्यालयात पोहोचले होते रशियाचे सैनिक

Advertisements

चीफ ऑफ स्टाफचा दावा ः अध्यक्षांचे कुटुंब होते आत

युद्धाच्या प्रारंभीच रशियाचे सैनिक अध्यक्ष झेलेंस्की आणि त्यांच्या कुटुंबाला पकडण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले होते असा दावा झेलेंस्की यांच्या एका सहकाऱयाने केला आहे. 24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होताच रशियाने झेलेंस्की आणि त्यांच्या कुटुंबाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात ते अपयशी ठरले होते.

टाइम नियतकालिकाने इनसाइट झेलेंस्की वर्ल्ड नावाने एक मुलाखत प्रकाशित केली आहे. यात झेलेंस्की यांचे चीफ ऑफ स्टाप एंड्री यर्मक यांनी हा दावा केला आहे. रशियाचे सैनिक युक्रेनचे अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेण्यासाठी आले होते. कीव्हमध्ये पोहोचलेले रशियाचे सैनिक झेलेंस्की आणि त्यांच्या कुटुंबाला पकडून ठार मारू पाहत होते. झेलेंस्की टार्गेट होते आणि अध्यक्षीय कार्यालय सुरक्षित स्थान नसल्याचे लवकरच स्पष्ट झाले होते असे यर्मक म्हणाले.

रशियाच्या सैनिकांनी 2 वेळा कार्यालय परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. अध्यक्षांच्या सुरक्षारक्षकांनी परिसराला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्या रात्रीपूर्वी आम्ही अशा गोष्टी केवळ चित्रपटांमध्ये पाहिल्या होत्या. झेलेंस्की यांचे कार्यालय आणि घराबाहेर गोळीबार होत होता. अध्यक्ष, त्यांच्या पत्नी, 17 वर्षीय मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा आतच होते. सुरक्षारक्षकांनी गेटवर बॅरिकेड्स आणि प्लायवुड बोर्ड लावून परिसर सुरक्षित केला. तर आत असलेल्या सुरक्षारक्षकांनी लाइट बंद केल्या होत्या. झेलेंस्की आणि त्यांच्या सहकाऱयांसाठी बुलेटप्रूफ जॅकेट आणि असॉल्ट रायफल आणल्या गेल्या. यातील काही जणांनाच शस्त्र हाताळता येत होते असे यर्मक म्हणाले.

तत्पूर्वी झेलेंस्की यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत भावुक आवाहन केले होते. मी, माझे कुटुंब आणि माझी मुले सर्व युक्रेनमध्ये आहेत. रशियाचे पहिले लक्ष्य मी आहे. तर माझे कुटुंबही त्यांच्या टार्गेटवर आहे. रशिया मला संपवून युक्रेनला राजकीय दृष्टय़ा उद्ध्वस्त करू पाहत असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले होते.

झेलेंस्की यांचा निर्धार

युद्ध सुरू झाल्यावर अमेरिकेने झेलेंस्की यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु झेलेंस्की यांनी हा प्रस्ताव फेटाळला होता. मला पलायन करण्याचा मार्ग नव्हे तर शस्त्रास्त्रs हवी आहेत असे त्यांनी म्हटले होते. युद्धादरम्यान अनेकदा झेलेंस्की यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Related Stories

अमेरिकेत 13 दिवसांमध्ये 3 मुस्लिमांची हत्या

Patil_p

रशियाकडून तात्पुरता युद्धविराम

datta jadhav

23 वर्षांची बाई…11 अपत्यांची आई

Patil_p

खार्किवमध्ये रशियन सैन्याचा प्रवेश

datta jadhav

म्यानमारमध्ये सत्तापालट…भारतीयांना फटका

Patil_p

काश्मीरचे स्वप्न पाहणे सोडून द्या!

Patil_p
error: Content is protected !!