वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
जगाच्या नकाशावरून युक्रेन देश पुसून टाकण्याची रशियाची महत्त्वाकांक्षा असल्याचा आरोप अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी केला आहे. त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसमोर बोलत होत्या. रशिया युक्रेनला आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी निश्चित स्वरुपाची माहिती ब्रिटनला मिळाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
रशियाने युक्रेन च्या पूर्व भागातील डोनेटस्क आणि लुहानस्क हे दोन प्रदेश गिळंकृत करण्याचा आटापीटा चालविला आहे. तसेच दक्षिण युक्रेनमधील खेरसन आणि झापोरीझाजिया हे भागही ताब्यात घेण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. पूर्व आणि दक्षिण युपेन ताब्यात आल्यानंतर या देशाचा मधला भाग ताब्यात घेण्यास रशियाला वेळ लागणार नाही, असा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे.
युक्रेन चा कडवा प्रतिकार
रशियासारख्या महाशक्तीशी युपेन गेले पाच महिने लढत आहे. सध्या या संघर्षावर रशियाचे वर्चस्व दिसत असले तरी युपेनने कडवा प्रतिकार चालविला आहे. त्यामुळे युपेन सहजगत्या ताब्यात घेण्याची रशियाची आशा मावळली आहे. रशियाला आता जपून पावले टाकावी लागत असून युपेनबरोबर चर्चेचे दरवाजेही खुले ठेवावे लागत आहेत. नुकताच रशिया आणि युक्रेन यांच्यात गहू आणि इतर खाद्यपदार्थांच्या निर्यातीसंबंधी करार झालेला आहे. त्यामुळे जगातील अन्नटंचाई काही प्रमाणात कमी होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.