युक्रेनला शस्त्रास्त्रs देणे बंद करण्याची रशियाची धमकी
युक्रेन युद्धाला 52 दिवस झाले असून रशियाच्या हल्ल्यादरम्यान युक्रेनच्या सैनिकांसह नागरिकांनीही जीव गमाविला आहे. 24 फेब्रुवारीपासून आतापर्यंत युक्रेनमध्ये सुमारे 2.5-3 हजार हजार सैनिक हुतात्मा झाले असून 10 हजारांहू अधिक जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी दिली आहे.
दुसरीकडे काळय़ा समुद्रात युद्धनौकेने जलसमाधी घेतल्यावर रशियाने अमेरिकेला इशारा दिला. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरविणे बंद करावे, अन्यथा अमेरिकेला कल्पनेपलिकडील जोख्मीला सामोरे जावे लागू शकते असे रशियाने म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी अमेरिकेला युक्रेनचे समर्थन करण्यापासून कुणीच रोखू शकत नसल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनसाठी 800 दशलक्ष डॉलर्सच्या सैन्य सहाय्याला मंजुरी दिली आहे. यात 11 हेलिकॉप्टर, 18 हॉवित्झर तोफा आणि 300 स्विचब्लेड ड्रोन सामील आहेत.
युक्रेनच्या पुनउर्भारणीकरता आम्ही मोठय़ा प्रमाणावर तयारीर करत आहोत. आयएमएफने युक्रेनच्या मदतीकरता आपत्कालीन निधी पूर्वीच वाढवून 1.4 अब्ज डॉलर्स केला असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी दिली आहे. तर युक्रेनला सैन्य सहाय्याच्या स्वरुपात एक अब्ज युरो देण्याची योजना आखत असल्याचे जर्मनीने स्पष्ट केले आहे. जर्मनीकडून मोठी शस्त्रास्त्रs मिळाली नसल्याची तक्रार युक्रेनने यापूर्वी केली होती.
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी अलिकडेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. रशियाला दहशतवाद पुरस्कृत करणारा देश घोषित करण्याची मागणी झेलेंस्की यांनी या चर्चेदरम्यान केली. परंतु बिडेन यांनी यासंबंधी कुठलेच आश्वासन दिले नसल्याचे समजते.
अमेरिकेने यापूर्वीच रशियाला दहशतवादाला पुरस्कृत करणाऱया देशांच्या यादीत सामील करण्यास नकार दिला आहे. या यादीत सध्या उत्तर कोरिया, सीरिया, क्युबा आणि इराण सामील आहे.