ऑनलाईन टीम / तरुण भारत :
श्रीलंकेप्रमाणेच आता इराकमध्येही आंदोलन सुरू झाले आहे. इराकमध्ये इराणसमर्थक व्यक्ती पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निवडल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. बुधवारी रात्री या संतप्त आंदोलकांनी संवेदनशील ग्रीन झोन ओलांडून बगदादमधील संसदेचा ताबा घेतला. सुरक्षा दलांनाही यावेळी लोकांना रोखण्यात अपयश आले.
माजी प्रांतीय गव्हर्नर मोहम्मद शिया अल-सुदानी यांना इराण-समर्थित पक्षाने पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिली आहे. त्याच्या निषेध करत आदोलकांकडून सुरू आहे. या आंदोलकांचा नेता हा धर्मगुरू मुक्तदा सदर अल-सद्र आहे. तो मुळात शिया आहे. आंदोलनकर्त्यांच्या हातात शिया नेता अल सदर यांचे फोटोही होते. संसदभवन ताब्यात घेण्यासाठी आंदोलकांनी संवेदनशील ग्रीन झोन ओलांडला. त्यावेळी पोलिसांनी सिमेंटच्या भींती तोडणाऱ्या आंदोलकांवर वॉटर कॅननचा वापर केला. पण आंदोलकांच्या संख्येपुढे पोलीस अपयशी ठरले. अनेक शहरांतून आंदोलक या ठिकाणी जमले होते.
संसद ताब्यात घेतल्यानंतर शेकडो लोक संसदेत इराकचा राष्ट्रध्वज फडकवताना, आणि टेबल-खुर्च्यांवर चढून घोषणाबाजी करताना दिसून आले. दरम्यान, यानंतर इराकचे कार्यकारी पंतप्रधान अल कदीमी यांनी आंदोलकांना ग्रीन झोन तात्काळ रिकामा करण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा : सुरज वशिष्ठची ऐतिहासिक कामगिरी; 32 वर्षानंतर ग्रीको रोमन कुस्तीत भारताला सुवर्ण