Tarun Bharat

स.प्रा. धाटवाडा पडोशे येथे गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

प्रतिनिधी / पणजी

  • गुरू आहे सावली, गुरू आहे आधार
  • गुरू आहे निसर्गात, नसे त्याला आकार
  • गुरू आहे अंतरात गुरू आहे साजरात
  • शिकावे ध्यान लावूनी गुरू आहे चराचरात

आपल्या हिंदू संस्कृतीत प्राचीन काळात गुरूकडून ज्ञान प्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जात असे. गुरूच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तसेच आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमेचा दिवस हा गुरूशिष्यांसाठी एक पर्वणीच असते.

मानवाच्या उद्धारासाठी महर्षी व्यासांनी वेदांची निर्मिती करून चार वेदातून ती जनमानसापर्यंत पोहोचवली. याचदिवशी महर्षी व्यासांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस गुरूपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. सरकारी प्राथमिक विद्यालय धाटवाडा पडोशे शाळेत गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला गेला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष श्रीदेवी कुंभारजुवेकर उपस्थित होत्या. तसेच शाळेतील प्रभाकर वझे, दिप्ती नाईक, इंग्रजी शिक्षक संजीव पाटील, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

दिप्ती नाईक यांनी प्रास्ताविक केले तर प्रभाकर वझे व संजीव पाटील यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाची सुरूवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मातृपूजन केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Stories

डिचोलीत कार व दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार.

Patil_p

वेतन थकबाकीच्या प्रश्नावर एमपीटीच्या कामगार संघटनेकडून केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन सादर

Omkar B

सुलभ शौचालयांमध्ये दिव्यांगांसाठी एका प्रसाधनगृहाची तरतूद

Patil_p

बससेवेअभावी खासगी, सरकारी कर्मचाऱयांचे हाल

Patil_p

‘ऑनलाईन’साठी नेटवर्कच्या शोधात विद्यार्थी अरण्यात

tarunbharat

सुर्ला – कोठंबी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात

Amit Kulkarni