वृत्तसंस्था/ सिडनी
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू श्रीधरन श्रीराम यांनी क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश केला होता. श्रीराम सध्या ऑस्ट्रेलियात फिरकी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील आपला प्रशिक्षकाचा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर येणार आहे. एस. श्रीरामने 2000 आणि 2004 या कालावधीत 8 वनडे सामने खेळले आहेत. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर ते 2015 पासून ऑस्ट्रेलियात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 46 वर्षीय श्रीराम चेन्नईचा रहिवासी आहेत. आगामी आयपीएल स्पर्धेत आरसीबी संघाची कामगिरी दर्जेदार व्हावी यासाठी श्रीरामने या संघाला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एस. श्रीरामने नाथन लियॉन, ऍडॅम झाम्पा, मिचेल स्वेप्सन, मॅक्सवेल व लाबुशाने यांना मार्गदशंन केले आहे.