sa. Ka. Patil Colleges Prof. Sunita Aajgaonkar passed away
मालवण मधील श्री. स का पाटील महाविद्यालयांच्या प्रा. सुनीता आजगांवकर यांचे दि. 16 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. मालवण येथील श्री स का पाटील महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल श्री म श आजगांवकर यांच्या सौभाग्यवती या सुद्धा श्री स का पाटील महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. जवळ जवळ 20 वर्षे मालवणमध्ये दोघेही अद्यापनाचे कार्य करीत होते. हे दोघेही कॉलेजमध्ये असताना अनेक सामाजिक आणि कॉलेजच्या अन्य कार्यक्रमांमध्ये मन लावून सहभागी होत असत. त्यानंतर श्री आणि सौ आजगावकर मुंबईत येऊन डोंबिवली कॉलेज, SNDT मध्ये कार्यरत होते. काल संध्याकाळी 7.00 वाजता प्रिन्सिपॉल, श्री आजगावकर यांच्या पत्नी सुनीता आजगावकर बाईंचे निधन झाले. भारत पेट्रोलियम मधील सौ स्मिता मिलिंद आजगांवकर याच्या त्या सासूबाई होत्या..
मालवण / प्रतिनिधी