उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे यांच्या हस्ते सीसीटीव्हीचे लोकार्पण
प्रतिनिधी/ दहिवडी
माण तालुक्याचे ठिकाण असलेली दहिवडी ही आता नजरकैदेत राहणार असून दहिवडीमधील महत्त्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांची चौफेर नजर असणार आहे, त्यामुळे दहिवडी शहर आता दहिवडी पोलिसांच्या नजरकैदेत राहणार आहे.
कोरेगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे यांच्या हस्ते सदर सीसीटीव्ही कॅमेरांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष तासगावकर, श्री ऍग्रो कंपनीचे सर्वेसर्वा सागर शेठ घोरपडे यांच्यासह नगरपंचायतीचे बांधकाम सभापती महेश जाधव,पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
श्री ऍग्रो ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा सागर शेठ घोरपडे यांच्या दातृत्वातून एकूण 16 सीसीटीव्ही कॅमेरे दहिवडी पोलीस स्टेशनला भेट देण्यात आले आहेत. यामुळे दहिवडीमध्ये असणाया वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे पोलिसांना सोपे जाणार आहे,आणि पोलिसांच्या कामातही सुसूत्रता राहण्यास मदत होणार आहे.
यामध्ये दहिवडीमधील एकूणच शिक्षण संकुलातील शिक्षण घेणाया अल्पवयीन मुली, युवती यांच्या सुरक्षाप्रश्नीही हे सीसीटीव्ही कॅमेरे मोलाची भूमिका बजावतील. त्याचबरोबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये होणारे मारामारीचे प्रकार ही या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांना रोखता येणार आहेत.
गेल्या काही दिवसात दहिवडीमध्ये वाढलेली गुन्हेगारी, चोयांचे वाढते प्रमाण, घरफोडया, जबरी चोयांसारखे प्रकार, चौकाचौकात घडणाया अपघाती घटना, त्याचबरोबर रोडरोमिओ यांच्यावरही या सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर राहणार असून या सीसीटीव्हीमुळे दहिवडी शहरावर आता पोलीस प्रशासनाची चौफेर नजर असणार आहे.