दानिश रेंजू यांच्याकडून दिग्दर्शन
सबा आझाद एक उत्तम अभिनेत्री आहे. नाटय़क्षेत्रात कार्यरत राहिलेलील अभिनेत्री स्वतःच्या चित्रपटांपेक्षा ऋतिक रोशनची प्रेयसी म्हणून अधिकचर्चेत आहे. सबा आता ‘साँग्स ऑफ पॅराडाइज’ या चित्रपटात दिसून येणार असून यातील एका दृश्यचित्र तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. दानिश रेंजू यांच्या या चित्रपटात सबा एका काश्मिरी गायिकेच्या मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
काश्मिरी कलाकारांच्या कहाणीवर आधारित या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. सबाने इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले असून यात ती काश्मिरी पेहरावात स्टेजवर माइकसमोर उभी असल्याचे दिसून येते. दिग्दर्शक दानिशे रेंजूने सबाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
सबा आझाद सारख्या दमदार कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव आनंददायी होता असे उद्गार अभिनेता शिशिर शर्माने काढले आहेत. सबाच्या लुकचे कौतुक करत चाहते चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाद्वारे काश्मीरमधील संगीत, संस्कृती आणि इतिहास मोठय़ा पडद्यावर पहायला मिळणार आहे.