Tarun Bharat

सबा आझादची वेबसीरिजकरता निवड

सुधीर मिश्रा करणार दिग्दर्शन

दिग्दर्शक सुधीर मिश्रा हे अत्यंत वेगळय़ा प्रकारचे चित्रपट तयार करण्यासाठी ओळखले जाते. अलिकडेच त्यांच्या दिग्दर्शनात प्रदर्शित करण्यात आलेली सीरिज ‘तनाव’ लोकप्रिय ठरली आहे. काश्मीरमधील स्थिती दर्शविणारी ही वेबसीरिज इस्रायली शो ‘फौदा’चा रिमेक आहे. प्रेक्षकांकडून ‘तनाव’ला मोठी पसंती मिळत आहे. तसेच सुधीर मिश्रा यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले जात आहे. सुधीर मिश्रा आता आणखी एक सीरिज घेऊन येणार आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधीर मिश्रा हे इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर वेबसीरिज निर्माण करणार आहेत. या सीरिजमध्ये सबा आझाद, रणवीर शौरी, आदिनाथ कोठारे, राजेश तेलंग आणि सई ताम्हणकर दिसून येणार आहे. ही सीरिज एका पुस्तकावर आधारित असणार आहे. किशोर कदमही यात मुख्य भूमिका साकारत आहेत. मुंबईतील याचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित चित्रिकरण दिल्लीत पार पडणार आहे. सबा आझादने यापूर्वी रॉकेट बॉइज या सीरिजमधील अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच ती आता दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे.

Related Stories

थँक गॉड : आधुनिक यमराज होणार अजय देवगण

Patil_p

व्हॉट्सअॅपने आणले नवे फिचर्स…जाणुन घ्या कोणकोणते झाले बदल!

Abhijeet Khandekar

बिग बॉसचे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन

Tousif Mujawar

सांगलीमध्ये “वास्तुरहस्य” वेब सिरीजचे चित्रीकरण

Archana Banage

झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये सोनाक्षी

Patil_p

शरद पोंक्षे यांचे वेबसिरीजमध्ये पदार्पण

Patil_p