Tarun Bharat

साबांखा मंत्र्यांचा कंत्राटदाराला दणका

Advertisements

बांधकाम परवाना दोन वर्षांसाठी निलंबित : रस्ता हॉटमिक्सिंग वाहून गेल्याचे प्रकरण

प्रतिनिधी / पणजी

हॉटमिक्सिंग केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात आलेल्या चार-पाच दिवसांच्याच पावसामुळे ते वाहून जाण्याचा प्रकार हा अत्यंत शरमेचा असून या प्रकरणी कंत्राटदार सी. ए. इब्राहिम यांचा बांधकाम परवाना पुढील 2 वर्षासाठी निलंबित करण्याचा आदेश सा. बां. खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि सा.बां. खा सचिवांना दिला आहे. मंत्री झाल्यानंतर नीलेश काब्राल यांचा हा पहिलाच दणका आहे.

पणजीतील रस्त्यांवरील हॉटमिक्सिंगचे डांबर गेले व केवळ खडीचे डोंगर तयार झाल्याने दुचाकी वाहनचालकांसाठी पणजीतील रस्ते म्हणजे अपघात प्रवण क्षेत्र ठरतेय. मंत्री नीलेश काब्राल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. संबंधित कंत्राटदार सी. ए. इब्राहिम यांच्यावर कडक कारवाई म्हणून त्यांना या रस्त्यांची फेरदुरुस्ती सुरू करावी लागणार आहेच, शिवाय त्यांच्या पुढील दोन वर्षासाठीचा बांधकाम परवाना देखील रद्द करण्याचा आदेश मुख्य सचिवांना त्यांनी दिलेला आहे.

खडी, डांबरीकरणाचे पृथःकरण

मंत्री नीलेश काब्राल यांनी अनेक सूचना वजा आदेश मुख्य सचिवाना तसेच साबांखा सचिवांना दिलेले आहेत. त्यात पणजीतील रस्त्यांची तपासणी करून त्यातील खडी आणि वाहून गेलेले डांबर त्यांचे नमुने काढून घेऊन गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी पृथःकरण करतील आणि सरकारला अहवाल देतील. त्यानंतर संबंधित अभियंत्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे. यासाठी या रस्ते बांधकामात नेमके कोण कोणते अभियंता आहेत यांची माहिती द्यावी, असे आदेशही मंत्री नीलेश काब्राल यांनी दिले आहेत.

पणजीत मांडवी पूल ते बसस्थानक, कोकणी अकादमी समोरील रस्ता, जुन्या सचिवालयपर्यंतचा रस्ता, मिरामार-कांपाल रस्ता, दिवजा सर्कल ते रायबंदर रस्ता, वास्को येथील रस्ता इत्यादींचा यात समावेश आहे. रस्त्यांची ही दुर्दशा पाहून शरमेने मान खाली गेली अशा शब्दात मंत्री नीलेश काब्राल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना व सा.बां. खात्याच्या सचिवांना या संदर्भात अहवाल तयार करून पाठविण्याचे आदेशही मंत्री काब्राल यांनी दिले आहेत.

Related Stories

हर्षा यांचे बायूल हे कोंकणी बालसाहित्यातील एक उत्कृष्ठ पुस्तक-

Patil_p

पेडणे वुमन्स, बार्देश इलेव्हनची महिला क्रिकेटमध्ये विजयी सलामी

Amit Kulkarni

पराष्टेतील शेतीत शिरले तेरेखोल खाडीचे पाणी

Patil_p

बेंगलोरचे खराब प्रदर्शन; आता ईस्ट बंगालकडून झाले पराभूत

Patil_p

शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार

Amit Kulkarni

युक्रेनमधून गोव्याची विद्यार्थिनी रुपल गोसावी पोचली गोव्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!