प्रतिनिधी /पणजी
सार्वजनिक विभागात कंत्राटी पध्दीतीवर काम करणाऱ्या कामगारांवर नेहमीच अन्याय केला जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आबे मात्र त्याच्याकेड कुणीही पाहत नाही. असे कामगार नेते क्रिस्तोफर फॉन्सेको यांनी सांगितले. सरकारे येतात आणि जातात कामगार मात्र नेहमी राबत असतो. असेही ते म्हणाले. जे सरकार सामान्य लोकांच्या हितासाठी नाही ते सरकार कशाला हवे. आज कामगार आहे म्हणूनच सगळे काही आहे आणि त्यानाच वाऱ्यावर सोडले जात आहे असेही क्रिस्तोफर म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बांधकाम विभागात कंत्राटी पध्दीतीवर काम करणाऱ्या कामगारांनी आयटकच्या झेड्याखाली 24 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आल्तिनो सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर निषेध धरणे धरले. त्यावेलावेळी क्रिस्तोफर फॉन्सेको बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत आर.डी.मंगेशकर, कॉ. सुहास नाईक व पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा संस्थेचे नेते कॉ. सुदीप पै नाईक, राजेश बेतोडकर, सायमन फालेरो, मोहनदास नाईक व अन्य कामगार उपस्थित होते.
कामगारांना 7व्या वेतन आयोगाचे फायदे तात्काळ लागू करण्याची मागणी फॉन्सेको यांनी केली. कामगार पुरवठा सोसायटी मध्ये कार्यरत कामगारांच्या इतर प्रलंबित समस्या/तक्रारींवर देखील यावेळी प्रकाश टाकण्यात आला. समान कामासाठी समान वेतन व अन्य सुविधा देम्यात यावे अशी मागणी कामगारांनी केली आहे.
सीवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये आणि धोकादायक कामात काम करणाऱ्या सर्व कामगारांना त्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा पोशाख आणि सुरक्षा उपकरणे प्रदान करणे आवश्यक आहे.