दुकानाचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नुकसान
वृत्तसंस्था/ कोल्लम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा पुन्हा एकदा चर्चेत आहे. केरळच्या कोल्लमध्ये एका दुकानदाराने यात्रेकरता देणगी न दिल्याने स्वतःच्या दुकानाची तोडफोड काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. या दुकानदाराचे नाव एस. फवाज असून तो कोल्लममध्ये भाजीविक्री करतो. तोडफोडीचा व्हिडिओ समोर आल्यावर केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनी तीन कार्यकर्त्यांना निलंबित केले आहे.
14 सप्टेंबर रोजी काँग्रेसचे काही स्थानिक नेते भारत जोडो यात्रेसाठी देगणी मागत होते. मी 500 रुपये दिल्यावर त्यांनी 2 हजार रुपयांची मागणी केली. इतकी रक्कम देण्यास नकार दिला असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुकानात तोडफोड करण्यासह भाज्या रस्त्यावर फेकल्याचा आरोप एस. फवाज यांनी केला आहे.
तक्रार नोंद
पीडित दुकानदाराने याप्रकरणी कुनिकोडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. यानुसार दुकानात तोडफोड करणाऱयांमध्ये युवा काँग्रेसचे महासचिव अनिस खान यांचाही समावेश होता. खान हेच स्वतःच्या 5 साथीदारांसह दुकानात पोहोचले होते. देणगीची रक्कम न दिल्याने त्यांनी दुकानात तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काँग्रेसने तीन कार्यकर्त्यांना निलंबित केले आहे.
वर्तन अस्वीकारार्ह
आम्ही अन्य पक्षांप्रमाणे कॉर्पोरेट फंडिंगद्वारे पैसे प्राप्त करत नाही. आम्ही छोटय़ा स्तरावर देणगी मिळवितो, ही देणगी लोक स्वमर्जीने देत असतात. कोल्लममधील घटनेत सामील 3 कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे कार्यकर्ते आमच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि त्यांचे वर्तन स्वीकारार्ह नसल्याचे केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनी म्हटले आहे.