Tarun Bharat

सचिनच्या ‘परफॉर्मन्स-बेस’ आयपीएल संघात ना रोहित, ना विराट!

कर्णधारपदी हार्दिक पंड्य़ाला पसंती, सलामीला बटलर-शिखर धवनला प्राधान्य

मुंबई / वृत्तसंस्था

लिजेंडरी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपला परफॉर्मन्स बेस आयपीएल संघ निवडला असून कर्णधारपदी हार्दिक पंडय़ाला पसंती दिली आहे. हार्दिक पंडय़ाने गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. यंदा सपशेल अपयशी ठरलेले रोहित शर्मा व विराट कोहली सचिनच्या या संघात समाविष्ट नाहीत. सचिनने त्याच्या यूटय़ुब चॅनेलवर एक व्हीडिओ पोस्ट करत याची माहिती दिली. खेळाडूचा लौकीक किंवा मागील कामगिरी याचा या निवडीत अजिबात विचार केलेला नाही. फक्त यंदाच्या हंगामातील कामगिरीच्या आधारे ही निवड केली आहे, असे सचिन या व्हीडिओत म्हणाला.

‘कर्णधारपदी हार्दिक पंडय़ाशिवाय आणखी कोणाचा विचार करण्याची आवश्यकताच नव्हती’, असे सचिन पंडय़ाविषयी म्हणाला. पंडय़ाने पदार्पणातील हंगामातच गुजरातला जेतेपद मिळवून देताना पुढाकाराने लढला. त्याने 15 सामन्यात 44.27 च्या सरासरीने 487 धावा केल्या. यात 4 अर्धशतकांचा समावेश राहिला. याशिवाय, त्याने 10 बळी देखील घेतले.

सचिनने आपल्या संघात जोस बटलर (राजस्थान) व शिखर धवन (पंजाब) यांना सलामीवीर म्हणून निवडले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत बटलरच्या फॉर्मला अजिबात तोड नव्हती, अशा शब्दात सचिनने त्याची प्रशंसा केली. ऑरेंज कॅप होल्डर असलेल्या बटलरने यंदा 17 सामन्यात 57.53 ची सरासरी, 4 शतके व 4 अर्धशतकांसह 863 धावांची आतषबाजी केली. धवनबद्दल बोलताना सचिनने स्ट्राईक रोटेट करण्यावरील त्याची हुकूमत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगितले. धवनने 14 डावात 38.33 च्या सरासरीने 460 धावांचे योगदान दिले. नाबाद 88 ही त्याची हंगामातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

सचिनने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला तिसऱया स्थानी निवडले. शिवाय, डेव्हिड मिलर (गुजरात), लियाम लिव्हिंगस्टोन (पंजाब), यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक (आरसीबी) यांचा समावेश केला. याशिवाय, मध्यमगती-जलद गोलंदाजी लाईनअपमध्ये जसप्रित बुमराह (मुंबई इंडियन्स), मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स) तर फिरकी गोलंदाजीत रशिद खान (गुजरात), यजुवेंद्र चहल (राजस्थान) यांना प्राधान्य दिले.

सचिन तेंडुलकर आयपीएल 2022 इलेव्हन ः जोस बटलर, शिखर धवन, केएल राहुल, हार्दिक पंडय़ा (कर्णधार), डेव्हिड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक, रशिद खान, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, यजुवेंद्र चहल.

Related Stories

केंट क्रिकेट क्लबचा जॅक्सन बर्डशी नवा करार

Patil_p

भारताच्या मेरी कोमला रौप्यपदक

Patil_p

आशियाई चॅम्पियनशिपसाठी अमित, विकासचा संघात समावेश

Patil_p

ग्रॅण्डमास्टर पी.इनियनला उपविजेतेपद

Patil_p

सराव सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

Patil_p

फलंदाज प्रशिक्षकासाठी विक्रम राठोड पुन्हा रिंगणात

Patil_p