Tarun Bharat

धारावीत सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा, ठाकरे गटातील ३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Advertisements

Sada Sarvankar vs ShivSainik : धारावीमध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे. या प्रकरणी ठाकरे गटातील तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री ही घटना घडली. सदा सरवणकर यांची गुरुवारी रात्री पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. बैठक संपल्यानंतर सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर तीघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाकरे गटातील 35 ते 40 कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

नेमकं काय घडलं

देवीच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. ही बैठक संपल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. यातून राडा झाला. मात्र पोलीस घटनास्थळी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आज धारावी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवून या अन्यायाविरोधात आंदोलन करणार असल्याचे उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.

Related Stories

कोरोना संकटात कार्यरत पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान : अजित पवार

Rohan_P

देशात 1.48 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

हिमाचलप्रदेशात बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

Rohan_P

वर्धा : मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स उलटली, 3 जखमी

datta jadhav

पंढरपूरचे सुपूञ नितीन खाडेंची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

Abhijeet Shinde

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्स रुग्णालयात दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!