Tarun Bharat

केतकी चितळे कणखर; मला तिचा अभिमान

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेचं (Ketaki Chitale) रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी समर्थन केलं आहे. केतकी कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. सदाभाऊ यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

केतकी चितळेने शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये केतकीविरोधात गुन्हे दाखल होत आहेत. असे असतानाच आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळापूर येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी केतकीचं समर्थन केलं आहे. सदाभाऊ म्हणाले, केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू स्वत: मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा प्रस्थापितांविरोधात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली होती, त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती, अमोल मिटकरी यांनीही ब्राम्हण समाजाला टार्गेट केले, त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का..? राज्यात सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवला असून, प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांच्यावर अन्याय केला आहे. आम्हाला हा प्रस्थापितांच्या वाडा पाडायचा आहे, असेही खोत म्हणाले.

Related Stories

अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास धनगर समाज बांधव उपस्थित राहणार

Sumit Tambekar

शरद पवारांसह केंद्रातील सर्वच नेत्यांनी मराठा आरक्षणावर लक्ष घालणे गरजेचे

Abhijeet Shinde

पोहायला गेलेल्या युवकाचा बंधाऱयात बुडून मृत्यू

Patil_p

चक दे कोल्हापूर…..मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचं रुप

Abhijeet Shinde

कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 713 वर, तीन नवे रुग्ण

Abhijeet Shinde

अभिनेत्री रवीना टंडनला पितृशोक

datta jadhav
error: Content is protected !!