मुंबई येथे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांकरिता “कोल्हापूर” येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणेबाबत सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यानुसार न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र पाठवून कोल्हापूरात सर्किट बँक स्थापन करण्यासाठी विनंती केली होती. तसेच महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत सकारात्मक ठराव देखील झाला आहे. परंतु यावर अद्याप याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत मुख्यंमंत्र्यांकडे पाठपुरावा केला.
या विषयाच्या अनुषंगाने “मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती”च्या शिष्टमंडळाने माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन याबाबत सरकारकडे आपला हा प्रश्न मांडण्याकरता विनंती केली होती. त्यानुसार आज माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्री यांनी आपलं सरकार याबाबत सकारात्मक असून “मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती” समवेत लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासित केले आहे.
Previous Articleअरिहंत हॉस्पिटलमध्ये तिसरी टावी शस्त्रक्रिया यशस्वी
Next Article कडोलीत खासदार अमोल कोल्हे यांचे झाले जल्लोषी स्वागत
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.