हिरोमोटो कॉर्पचे अध्यक्ष व सीईओ पवन मुंजाल यांचे प्रतिपादन
वाहनांच्या (ईव्ही) सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे असे प्रतिपादन सीआयाय या कार्यक्रमप्रसंगी दुचाकी वाहन कंपनी हिरोमोटोचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांनी केले आहे.
आता वाहन उद्योग हा वेगाने विद्युतीकरणाच्या दिशेने प्रवास करत आहे. मात्र यामध्ये उपलब्ध होणारी वीज, परिस्थितीनुसार प्राप्त होणारे तंत्रज्ञान, सरकारकडून मिळणारी आर्थिक सवलत किंवा सबसिडी व ईव्ही कचऱयाची कोणत्या मार्गाने विल्हेवाट लावायची यासाठी भविष्य काळात आपल्याला महत्वपूर्ण भूमिका निभावण्याची जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याचे सीईओ मुंजाल यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात वाहन क्षेत्र इलेक्ट्रिक राहणार
वाहन क्षेत्राचा आगामी प्रवास पाहता येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा अधिक राहणार आहे. सध्या काही कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. परंतु भविष्यात देशातील वाहन क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढती राहणार असल्याचा दावा यावेळी सीईओ पवन मुंजाल यांनी केला आहे.