Tarun Bharat

भगवेमय वातावरण; हजारोंची उपस्थिती

Advertisements

टाळ-मृदंगाच्या गजरात दौडचे स्वागत : विविध ठिकाणी जिवंत देखावे : 32 मण सुवर्ण सिंहासनाबाबत दौडमध्ये जागृती

प्रतिनिधी /बेळगाव

हिंदू धर्मियांना त्यांच्या संस्कृतीची जाणीव व्हावी, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडमधून युवापिढीला संस्काराचे धडे दिले जात आहेत. शुक्रवारी झालेल्या दौडमध्ये भगवेमय वातावरण दिसून आले. दुर्गादेवीचा जयघोष करत हजारोंच्या संख्येने तरुणाई उपस्थित होती. त्यांच्यामध्ये असणारा उत्साह आणि जल्लोष यामुळे प्रसन्नमय वातावरण पहायला मिळाले. वडगाव येथे फुलांचा वर्षाव करत रांगोळय़ा घालून करण्यात आलेले दौडचे स्वागत लक्षवेधी ठरले.

खासबाग येथील दुर्गामाता मंदिरापासून शुक्रवारच्या दौडला प्रारंभ झाला. डॉ. गोपाळराव साळुंखे व मजुकर मामा यांच्या हस्ते आरती करण्यात आली. डॉ. गोपाळराव साळुंखे यांनी ध्वज चढविला. खासबाग, भारतनगर, वडगाव व जुने बेळगाव येथे भव्य दौड काढण्यात आली.

वडगाव येथील मंगाई मंदिरात दौडची सांगता झाली. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर डॉ. गोपाळराव साळुंखे यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. शुक्रवारच्या दौडमध्ये रायगड येथे पुनर्स्थापित करण्यात येणाऱया 32 मण सुवर्ण सिंहासनाविषयी जागृती करण्यात आली. अनंत भास्कर कांबळे यांनी 1101 रुपये, प्रमोद मनोहर मण्णूरकर यांनी 5001 रुपये, अनंत लक्ष्मण आजरेकर यांनी 2501 रुपये, मारुती अर्जुन पाटील यांनी 1001 रुपये, कारभार गल्ली येथील नरवीर रासलिला दांडिया ग्रुपतर्फे 5001 रुपयांचा कर्तव्य निधी शिवप्रति÷ानच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आला.

विविध ठिकाणी सुंदर देखावे

रयत गल्ली, वडगाव येथील नागरिकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात दौडचे स्वागत केले. विठुरायाच्या नावाचा गजर करून हरिनामाची भजने सादर करण्यात आली. ढोर गल्ली येथील नागरिकांनी शिवकालीन पाळण्याचा देखावा साकारला होता. तसेच लहान मुलांनी शिवकालीन व्यक्तिरेखांची वेशभूषा परिधान केली होती. तसेच काही ठिकाणी सुंदर देखावे सादर करण्यात आले.

दौडमधून मराठमोळय़ा संस्कृतीचे दर्शन

वडगाव, जुने बेळगाव, खासबाग या मराठमोळय़ा परिसरात शुक्रवारी झालेल्या दौडमध्ये भगवेमय चित्र पहायला मिळाले. गल्लोगल्ली लावण्यात आलेले भगवे ध्वज, भगव्या फेटय़ांमधून करण्यात आलेली सजावट, फुलांचा वर्षाव, घालण्यात आलेल्या रांगोळय़ा अशा सळसळत्या उत्साहात दौडचे स्वागत करण्यात आले. यावषीची सर्वाधिक उपस्थिती शुक्रवारी दिसून आली. 24 ते 25 हजार शिवभक्तांनी या दौडमध्ये सहभाग घेतला, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.

रविवार दि. 2 ऑक्टोबर रोजीचा मार्ग

नाथ पै सर्कल शहापूर येथील अंबाबाई मंदिरापासून दौडला प्रारंभ होणार आहे. लक्ष्मी रोड, कारवारी गल्ली, लक्ष्मी रोड, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरीनगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवाण गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमल गल्ली, खडेबाजार, महात्मा फुले रोड, मीरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, महात्मा फुले रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार दाणे गल्ली, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे सांगता होणार आहे.

Related Stories

कंग्राळ गल्लीत साकारला विजापूरचा भव्य किल्ला

Patil_p

हिंडलगा ग्राम पंचायतीमार्फत विविध रस्ताकामांचा शुभारंभ

Amit Kulkarni

अहंकाराला मोडण्याची शक्ती जनतेत

Patil_p

तलाव खोदाईसाठी बागायतकडून अनुदान

Amit Kulkarni

गाळे हस्तांतरासाठी अनामत रक्कम, आगाऊ भाडे भरण्याची सूचना

Amit Kulkarni

सराफी पेढीतील चेन पळविणाऱया जोडगोळीला अटक

tarunbharat
error: Content is protected !!