प्रतिनिधी/ डिगस-
सह्याद्री माध्यमिक विद्यालय,भडगांव बु. ता. कुडाळ शाळेचा मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा (दहावीचा) निकाल 100 टक्के लागला आहे. निहार अमोल मुंज हा विद्यार्थी 91.60 टक्के गुण मिळवून प्रशालेतून पहिला आला आहे. कु. अश्विनी आlमाराम फोंडेकर हि 89.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर हर्षद पंढरी कोलगावकर हा 89.20 टक्के गुणाbसह तृतीय क्रमांकाने उlतीर्ण झाला आहेत.
यावर्षी या शाळेतून 37 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 37 विदय़ार्थी विशेष प्रवीण्यासह उlतीर्ण झाले असून, या प्रशालेमधून विशेष प्रविण्यामध्ये 19 तर प्रथम श्रेणी मधून 14 व द्वाrतीय श्रेणीतुन 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, सचिव संभाजी वळंजू, सर्व संचालक, मुख्याध्यापक सचिन धुरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.