दापोली प्रतिनिधी
दापोली येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट पाडण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारला येणारा अंदाजित खर्च 1 कोटी रुपये येणार आहे.
साई रिसॉर्टची मालकी कांदिवली (पूर्व) येथील रहिवासी सदानंद कदम यांच्याकडे आहे तर सी शंख बीचची मालक ठाणे येथील रहिवासी आहेत. हा रिसॉर्ट पाडण्यासाठी येणार खर्च राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकताच वर्ग करण्यात आल्याचे टविट् किरीट सोमय्या यांनी नुकतेच केले होते. साई रिसॉर्ट पूर्वी राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांच्या मालकीचे होते. विद्यमान मालकांकडून हे पाडण्याचा खर्च वसूल केला जाणार आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी वास्तू बांधण्यात आल्या होत्या.