Tarun Bharat

सायना, श्रीकांत, प्रणॉय दुसऱया फेरीत

महिला दुहेरीत दोन जोडय़ांची आगेकूच, तनिशा-इशान पराभूत

वृत्तसंस्था/ टोकियो

सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय यांनी एकेरीत तर महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद आणि अश्विनी भट व गायत्री गौतम यांनी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात करीत दुसरी फेरी गाठली. तनिशा क्रॅस्टो व इशान भटनागर यांचे मिश्र दुहेरीतील आव्हान मात्र दुसऱया फेरीत समाप्त झाले.

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्या सायनाने हाँगकाँगच्या चेयुंग एन्गन यी हिच्यावर 21-19, 21-9 अशी मात केली. 32 वर्षीय सायनाने याआधी या स्पर्धेत रौप्य व कांस्यपदक मिळविले असून दुसऱया फेरीतील प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहाराने दुखापतीमुळे माघार घेतल्याने तिला उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले आहे. एचएस प्रणॉयनेही या स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात करताना ऑस्ट्रियाच्या ल्युका रॅबवर 21-12, 21-11 असा विजय मिळविला. अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतनेही पहिल्या फेरीत आयर्लंडच्या एन्हात एन्ग्युएनवर 22-20, 21-19 अशी 51 मिनिटांच्या खेळात मात करून दुसरी फेरी गाठली.

त्रीसा-गायत्रीची विजयी सुरुवात

महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनीही विजयी प्रारंभ करीत दुसरी फेरी गाठली. मलेशियाच्या यीन युआन लो व व्हॅलेरी सिओ यांच्यावर 21-11, 21-13 असा विजय मिळविताना त्यांना फारसा संघर्ष करावा लागला नाही. दुहेरीची आणखी एक जोडी अश्विनी भट के. व शिखा गौतम यांनीही दुसरी फेरी गाठली. त्यांनी इटलीच्या प्रतिस्पर्ध्यांवर 21-8, 21-14 अशी सहज मात केली.

मात्र मिश्र दुहेरीत वेंकट गौरव-जुही देवांगन यांना पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या गेगरी मेयर्स व जेनी मूर यांच्याकडून त्यांना 10-21, 21-23 असा पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडच्या जोडीने पहिला गेम सहज जिंकला. मात्र दुसऱया गेममध्ये भारतीय जोडीने जोरदार संघर्ष केला. पण ते इंग्लंडच्या जोडीला विजयापासून रोखू शकले नाहीत. याच प्रकारात तनिशा क्रॅस्टो व इशान भटनागर या भारतीय जोडीचे आव्हानही दुसऱया फेरीत संपुष्टात आले. थायलंडच्या सुपाक जोमकोह व सुपिसारा पी. यांनी त्यांच्यावर 21-14, 21-17 असा विजय मिळविला.

पुरुष दुहेरीतही केपी गरग व व्हीव्हीजी पंजाला या भारतीय जोडीला पराभूत व्हावे लागले. फ्रान्सच्या एफ. डेलऱयू व डब्ल्यू व्हिलेजर यांच्याकडून त्यांना 21-14, 21-18 असा पराभव स्वीकारावा लागला.

Related Stories

सिंधू, प्रणितचे आव्हान संपुष्टात

Patil_p

हॅपी बर्थडे, विराट!

Patil_p

मोहन बागान-केरळ ब्लास्टर्स यांच्यात सलामी

Patil_p

सुपर ओव्हरमध्ये झारखंडचा विजय

Patil_p

गांगुलीकडून दहा हजार लोकांच्या जेवणाची सोय

Patil_p

भारत-जपान महिला हॉकी सामना आज

Patil_p