Tarun Bharat

सावंतवाडीत 20 डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथी

Saint Gadge Baba’s death anniversary on December 20 in Sawantwadi

सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 20 डिसेंबरला सावंतवाडी येथील वटसावित्री सभागृह खासकिलवाडा येथे श्री संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.


यावेळी सकाळी सात वाजता संत गाडगेबाबा मंडईची साफसफाई करण्यात येणार आहे. नऊ वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसाद वाटप, दहा वाजता परीट समाज बांधवांची बैठक होणार आहे. अकरा वाजता कीर्तन, दुपारी एक वाजता महाप्रसाद, तीन वाजता राणी जानकीबाई सुतिकागृह व कुटीर रुग्णालय येथे फळे व प्रसाद वाटप. नंतर भजन व विविध कार्यक्रम होणार आहेत. अशा विविध कार्यक्रमाने संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.


अधिक माहितीसाठी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर मो. नं. 9422586114 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, सेक्रेटरी योगेश आरोलकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर यांनी केले आहे. तरी या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व परीट बंधू भगिनींनी व गाडगेबाबांच्या भक्तांनी व सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करण्यात आली आहे.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

आंबा बागायतदारांकडून समस्येचे संधीत रुपांतर

Patil_p

पत्नीचा खून करुन तरुणाची गळफासाने आत्महत्या

Patil_p

माडखोलला मोफत वृत्तपत्र वाचनालय

NIKHIL_N

सागरी सुरक्षारक्षक पगाराविना!

Patil_p

पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण

Anuja Kudatarkar

जिवंत गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ, घातपाताची शक्यता?

Patil_p