Tarun Bharat

साईराज वॉरियर्स, बीसीसी मच्छे संघ विजयी

Advertisements

के. आर. शेट्टी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित दुसऱया के. आर. शेट्टी टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीसीसी मच्छे संघाने मार्ग रायजिंग स्टार संघाचा 8 गडय़ानी तर साईराज वॉरियर्स संघाने झेवर गॅलरी डायमंड संघाचा तीन गडय़ानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अमर घाळी (बीसीसी मच्छे), रोहित पाटील (साईराज वॉरियर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानात खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मार्ग रायजिंग स्टार संघाने 15 षटकात 4 बाद 143 धावा केल्या. केदार उसुलकरने 58, निलेश पाटीलने 51, झिनत मुडबागिलने 17 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे अमर घाळीने 4 धावात 2 तर मनोज पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीसीसी मच्छे संघाने 13.1 षटकात 2 बाद 147 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. अमर घाळीने 52, वेंकटेश शिराळकरने 45, शिवप्रकाश हिरेमठने 22, आकाश असलकरने 19 धावा केल्या. मार्ग रायजिंग संघातर्फे ओंकार पाटील व झिनत एबीएम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात झेवर गॅलरी डायमंड संघाने 20 षटकात 7 बाद 147 धावा केल्या. अमेय भातकांडेने 45, नागेंद्र पाटीलने 36, चेतन पांगिरेने 29 तर माजीद मकानदारने 13 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे नरेंद्र मांगोरेने 18 धावात 3, शुभम गौंडाडकरने 28 धावात 3, शाहिदने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज वॉरियर्सने 16 षटकात 7 बाद 148 धावा करून सामना 3 गडय़ांनी जिंकला. रोहित पाटीलने 36, सुधन्वा कुलकर्णीने 32, नरेंद्र मांगोरेने 14 धावा केल्या. झेवर गॅलरी डायमंडतर्फे माजिद मकानदारने 42 धावात 3 तर ताहिर सराफने 31 धावात 2 गडी बाद केले.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे निशिल पोतदार, जयसिंग रजपूत, सचिन चव्हाण, प्रवीण कराडे यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार अमर घाळी, इम्पॅक्ट खेळाडू व उत्कृष्ट झेल केदार उसुलकर यांना चषक देवून गौरविण्यात आले. तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे अमन उसुलकर, सुजित चौगुले, नरेश जाधव, नाशिर पठाण यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार रोहित पाटील, इम्पॅक्ट खेळाडू नरेंद्र मांगोरे, उत्कृष्ट झेल ताहीर सराफ यांना चषक देवून गौरविण्यात आले.

14 व 15 तारखेला स्पर्धेला सुटी असून, पुढील सामने शनिवारपासून खेळविण्यात येणार आहेत. या दरम्यान के. आर. शेट्टी फौंडेशनतर्फे सुट्टीनिमित्त मनोरंजन म्हणून फौजी इलेव्हन, केबल ऑपरेटर, पोस्ट इलेव्हन व ऍडव्होकेट इलेव्हन यांच्यात प्रदर्शनीय टेनिसबॉल सामने सकाळी खेळविण्यात येणार आहेत. तर दुपारी महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी विजया क्रिकेट अकादमी व नागराज क्रिकेट अकादमी यांच्यात लेदरबॉलचा सामना खेळविण्यात येणार आहे.

Related Stories

यरनाळ येथे उद्या शांतीस्तंभाचे लोकार्पण

Patil_p

जिल्हाधिकाऱयांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

Patil_p

स्मार्ट सिटीच्या कामात दिरंगाई; नागरिकांचे हाल

Patil_p

फार्मसी विद्यार्थ्याची बेळगावात आत्महत्या

Amit Kulkarni

‘त्या’बुडालेल्या दोन सख्ख्या बहिणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

बेळवट्टी येथे ग्राम वन सेवा केंद्राचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!