Tarun Bharat

राष्ट्रकुलसाठी साजन प्रकाश, श्रीहरी नटराजवर मुख्य भिस्त

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ब्रिटनमधील बर्मिंगहम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय जलतरण संघटनेने चार जणांचा संघ जाहीर केला असून त्यामध्ये साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज यांचा समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय जलतरण संघामध्ये साजन प्रकाश, श्रीहरी नटराज, दिल्लीचा जलतरणपटू कुशाग्र रावत आणि मध्यप्रदेश अद्वैत पागे यांचा समावेश आहे. 2018 गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वरील जाहीर करण्यात आलेल्या जलतरणपटूंनी आपल्या क्रीडाप्रकारात सहावे स्थान मिळविले होते.

बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची निवड कोटा पद्धतीने करण्यात आली आहे. एक वर्षांच्या पात्र फेरी कालावधीत श्रीहरी, साजन अद्वैत आणि कुशाग्र यांनी सहावे स्थान मिळविले होते. साजन प्रकाश पुरूषांच्या 200 मी. बटरफ्लायमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार असून तो राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले पदक मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच तो 50 मी. 100 मी. आणि 200 मी. बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे.

श्रीहरी नटराज 50 मी., 100 मी., 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सहभागी होणार आहे. कुशाग्र आणि पागे हे जलतरणपटू पुरूषांच्या 1500 मी. फ्री स्टाईल त्याचप्रमाणे कुशाग्र 200 मी. व 400 मी. फ्री स्टाईलमध्ये भाग घेणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आजपर्यंत जलतरण प्रकारात पदक मिळविता आलेले नाही. बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत जलतरण क्रीडाप्रकार 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. 2010 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा पॅरा जलतरणपटू प्रशांत कर्माकरने 50 मी. फ्री स्टाईल कांस्यपदक मिळविले होते.

Related Stories

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का; अक्षर पटेलला कोरोनाची बाधा

Rohan_P

दिल्लीचा मुंबई इंडियन्सला पराभवाचा ‘शॉक’!

Patil_p

भारत-दक्षिण कोरिया यांच्यात उपांत्य लढत

Patil_p

टीम इंडियाला आणखी एक धक्का; कर्णधार राेहित शर्मा काेराेना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कारच्या धडकेत वृद्ध ठार, क्रिकेटपटूला अटक

datta jadhav

लंकेचा मलिंगा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p
error: Content is protected !!