साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी (Sakinaka rape-murder case) न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी न्यायालयाने हा आदेश दिला आहे. विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावताना हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मीळ असल्याचं म्हटलं आहे.
आरोपीला ३० मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आज विशेष न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर सुनावणी करताना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पीडितेच्या वकिलांनी दोषी मोहन चौहान याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. पीडितेच्या वकिलांकडून हा गुन्हा दुर्मिळातील दूर्मीळ असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता.
मुंबईसारख्या महानगरात महिलांच्या सुरक्षेची भिती निर्माण झाली असल्याचे पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं होतं. याचबरोबर एका महिलेविरुद्ध आणि अनुसूचित जातीच्या महिलेविरुद्धचा हा गंभीर गुन्हा असल्याचे त्यांनी म्हटंल आहे.
नेमके प्रकरण काय?
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोहन चौहान याने मुंबईतील साकीनाका परिसारत एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घालून हत्या केली होती.
Sakinaka Rape Murder Case : दोषीला फाशीची शिक्षा ; न्यायालयाचा निर्णय
Advertisements