Tarun Bharat

रोख नव्हे तर सोन्यात मिळणार पगार

लंडनमधील कंपनीने स्वीकारला नवा मार्ग

लंडन येथील एका कंपनीचे सीईओ कॅमेरून पैरी आता स्वतःच्या कर्मचाऱयांना रकमेत नव्हे तर सोन्याच्या स्वरुपात वेतन देणार आहेत. या कंपनीच टेलिमनी असून ती आर्थिक सेवा उपलब्ध करते. पैरी यांनी कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱयांसोबत याचा प्रयोग सुरू केला असून लवकरच ही योजना सर्व कर्मचाऱयांसाठी लागू करण्यात येईल.

Advertisements

या माध्यमातून आपण कर्मचाऱयांना महागाईच्या प्रभावातून वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत. पारंपरिक धन सातत्याने स्वतःच क्रयशक्ती गमावत असताना सोने लोकांना महागाईपासून दिलासा देणारी सर्वात चांगली संधी देत असल्याचे पैरी यांचे म्हणणे आहे.

पाउंडचे मूल्य धोकादायक वेगाने कमी होत असताना सोन्याचे मूल्य सातत्याने वाढत आहे. हा बदल उघडय़ा जखमेवर मलम लावण्यासारखा आहे. कंपनीकडे 20 पेक्षा अधिक कर्मचारी असून सध्या हा प्रयोग केवळ वरिष्ठ कर्मचाऱयांसोबत केला जातोय असे पैरी यांनी सांगितले. पैरी स्वतःचे वेतन देखील सोन्याच्या स्वरुपात स्वीकारत आहेत. पाउंड आणि पेन्समध्ये विकणाऱया वस्तू आणि सेवांना सोन्याच्या बदल्यात खरेदी केले जाते, तेव्हा त्यांचे मूल्य अधिकच वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कंपनीची ही नवी वेतन व्यवस्था कर्मचाऱयांना सोन्याचे बिस्कीट देण्याची नाही. कर्मचाऱयांतान पाउंडचा सोन्याशी असणारा विनिमय दर त्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केला जाणार आहे. परंतु कर्मचारी या नव्या व्यवस्थेतून बाहेर राहण्याचा पर्याय स्वीकारू शकतात आणि थेट पाउंडमध्ये वेतन प्राप्त करू शकतात.

Related Stories

युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले

Sumit Tambekar

अमेरिकेत ड्रीम अँड प्रॉमिस ऍक्ट

Patil_p

जपानमध्ये वाढली ‘हिकिकोमोरी’ची समस्या

Amit Kulkarni

गर्दीअभावी ट्रम्प यांची दुसरी सभा रद्द

datta jadhav

ट्रम्प यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर

datta jadhav

मेहुल चोक्सी सुनावणीस अनुपस्थित

Patil_p
error: Content is protected !!