Tarun Bharat

विवाह होताच वाढते वेतन

 भारतीय कंपनी देते ‘वेडिंग गिफ्ट’

गुणवत्तापूर्ण कर्मचाऱयाला आयटी कंपनीशी दीर्घकाळ स्वतःसोबत जोडून ठेवणे अवघड मानले जाते. परंतु एका भारतीय कंपनीने यावर उपाय शोधून काढल्याचे समजते. ही कंपनी स्वतःच्या कर्मचाऱयांना मोफत मॅचमेकिंग सर्व्हिस पुरविते. एखाद्या कर्मचाऱयाचा विवाह होताच त्याला विशेष इंक्रीमेंट देखील दिली जाते. तसेच दर 6 महिन्यांनी कंपनी सर्व कर्मचाऱयांना इंक्रीमेंट देते.

मदुराई येथील श्री मूकांबिका इन्फोसोल्युशन कंपनी आणि त्याच्या सहकारी कंपन्यांमध्ये 750 जण काम करतात, यातील 40 टक्के कर्मचारी हे 5 वर्षांपेक्का अधिक काळापासून तेथे कार्यरत आहेत.

2006 मध्ये तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती. आता ही कंपनी खूप मोठी झली आहे. एका छोटय़ा शहरात गुणवत्तापूर्ण कर्मचारी मिळविणे मोठे आव्हान ठरले होते. 2010 मध्ये कंपनी मदुराई येथे स्थानांतरित झाली. तर बहुतांश आयटी कंपन्या चेन्नईला प्राधान्य देतात. चेन्नईच्या तुलनेत मदुराईमध्ये ऑपरेटिंग कॉस्ट 30 टक्के कमी आहे.

टियर-1 शहरात अशाप्रकारची कम्युनिटी तयार केली जाऊ शकत नसल्याचे कंपनीचे सीईओ आणि संस्थापक एम.पी. सेल्वागणेश यांनी म्हटले आहे. कंपनीला प्रारंभी पात्र कर्मचारी शोधण्यास अडचणी येत होत्या. कंपनीवर मदुराईतील स्टार्टअपचा शिक्का बसला होता. कंपनीत मॅरिज इंक्रीमेंटची तरतूद पहिल्या दिवसापासून होती. मग नंतर मॅचमेकिंग सर्व्हिसही पुरविण्यात येऊ लागली. कंपनी सर्व कर्मचाऱयांचे वर्षात दोनवेळा 6-8 टक्क्यांची इंक्रीमेंट करते. आमचे कर्मचारी आम्हाला सोडून जाणार नाही याचा विश्वास असल्याचे सेल्वागणेश म्हणाले.

Related Stories

सीबीएसई दहावी-बारावी परीक्षा 4 मे 2021 पासून

Patil_p

भारतात मागील 24 तासात 22,572 नवे कोरोना रुग्ण, 482 मृत्यू

datta jadhav

केरळच्या आमदारांवर चालणार खटला

Patil_p

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 546 नवे रुग्ण

Tousif Mujawar

एआयएमआयएमकडून अतीक अहमद यांना उमेदवारी

Patil_p

असदुद्दीन ओवैसीविरुद्ध याचिका सादर

Patil_p