Tarun Bharat

जुलैमध्ये 60 हजार ट्रक्टर्सची विक्री

Advertisements

देशातील निम्मे ट्रक्टर यूपी, राजस्थान आणि महाराष्ट्राकडून खरेदी

नवी दिल्ली

 भारताच्या ट्रक्टर उद्योगात मागील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये 59,586  इतक्या संख्येने विक्री करत नवा विक्रम नोंदवला आहे. वार्षिक आधारावर ही 28टक्के घट असल्याची माहिती आहे. मागील वर्षी मान्सून काही प्रमाणात सक्रिय नव्हता यामुळे विक्रीत घसरण झाल्याचे समोर आले होते. तसेच जुलै महिन्यात देशातील अनेक भागात पूर, पाणी साचले आणि अतिवृष्टी झाली. त्यामुळे त्याचा परिणाम हा ट्रक्टर विक्रीवर झाला होता.    ट्रक्टर जंक्शनच्या डिजिटल मार्केट पोर्टलद्वारे यांनी सादर केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.

विक्रीत अव्वल स्थानी राहिलेली राज्ये

देशातील प्रमुख राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात ही राज्ये ट्रक्टर विक्रीत टॉप-5 वर राहिली आहेत. एकमात्र या आकडेवारीमध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश
आणि तेलंगणा या राज्यांच्या विक्रीची माहिती उपलब्ध नाही आहे.

ब्रँडनुसार विक्रीला पसंती

महिंद्रा अँड महिंद्राने जुलैमध्ये सर्वाधिक विक्री नोंदवली, त्यानंतर स्वराज ट्रक्टर, सोनालिका ट्रक्टर, मॅसी फर्ग्युसन आणि एस्कॉर्ट्सचा क्रमांक लागतो.

मागील वर्षापेक्षा कमीच विक्री ः गुप्ता

जुलै महिन्यात ट्रक्टरची विक्री गेल्या वर्षीच्या उच्च पातळीपेक्षा कमी झाली आहे. मात्र येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरी पावसाचा आयएमडी यांचा अंदाज (एलपीए 96-104 टक्के) आणि ट्रक्टर व इतर कृषी उपकरणांच्यासाठी सकारात्मक वातावरण राहणार असल्याचे ट्रक्टर जंक्शनचे संस्थापक रजत गुप्ता यांनी यावेळी सांगितले आहे.

Related Stories

जग्वार लँड रोव्हरच्या विक्रीत 12 टक्के वाढ

Patil_p

नवी इकोस्पोर्ट एसई दाखल

Amit Kulkarni

होंडा मोटारसायकल्सवर सवलत

Patil_p

‘मारुती’कडे सीएनजीची 7 मॉडेल्स उपलब्ध

Patil_p

इलेक्ट्रिक स्कूटरमधील आग : नव्या लाँचिंगवर येणार निर्बंध ?

Amit Kulkarni

‘बीएमडब्लू’ एम 4 लक्झरी कार सादर

Patil_p
error: Content is protected !!