Tarun Bharat

सातारा येथील गुरुवार पेठेत गांजा विक्री; तरुणावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/सातारा

गुरुवार पेठेत मर्कज गांजा जवळ बाळगणाऱ्या एका युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल संथनाथ कबाडे(वय 35) असे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार पेठे परिसरात अतुल कबाडे याने गांजा जवळ बाळगल्याचे निदर्शनास आले. त्याच्याजवळ ३ हजार ४०० रुपयांच्या ३४ कागदी गांजाच्या पुडय़ा, ७ हजार रुपयांच्या पोपटी रंगाच्या पिशवीत ५०० ग्रॅमचा गांजा, १ हजार ७०० रुपयांचे काळ्य़ा रंगाचे तीन बॉक्स, १ हजार २३० रुपयांची रोख रक्कम, १ हजार रुपयांचा मोबाईल असा ऐवज हस्तगत केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे हे करत आहेत.

Related Stories

रहिमतपूर नगर परिषदेच्या आदर्श रमाई घरकुलाचे जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Archana Banage

तारळी नदीपात्रात पडतोय कचरा

Patil_p

थंडीचा जोर वाढला : पारा 26 अंशावर

Patil_p

फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तिघा मोटारसायकल चोरट्यांना केलं जेरबंद

Archana Banage

दर्पण पुरस्कार वितरण तरुण भारत प्रतिनिधी प्रा.रमेश आढाव यांचा पुरस्कारात समावेश

Patil_p

सातारच्या लेकीचा सिंगापुरात गणेशोत्सव

Patil_p