बेळगाव : कोल्हापूर सर्कल, एस. पी. ऑफिस रोड येथील गोटाडगी मोटारतर्फे रॉयल एनफिल्ड कंपनीच्या शक्तीशाली ‘गुरिल्ला-450’ या दुचाकीचा शुभारंभ करण्यात आला. रॉयल एनफिल्ड या प्रतिष्ठित मोटारसायकल कंपनीने आपली नवीन मोटारसायकल बाजारात आणली आहे. गुरिल्ला-450 दुचाकी पाहण्यासाठी दुचाकी चाहत्यांची गर्दी झाली होती. या दुचाकीमुळे प्रतिष्ठित दुचाकी वाहनांमध्ये आणखी एक भर पडणार आहे. गोटाडगी मोटार्सचा व्यवस्थापकीय संचालक सुशील गोटाडगी यांच्या हस्ते गुरिल्ला-450 दुचाकीचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी या वाहनाची विशेषत: सांगितली. नवीन डिझाईनमुळे ही बाईक लवकरच तरुणांच्या गळ्यातील ताईत बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक रंगांमध्ये ही बाईक ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. बुकिंगसाठीही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. नेहमीच प्रिमियम दुचाकी बनविणाऱ्या रॉयल एनफिल्ड कंपनीने पुन्हा एकदा दुचाकीचालकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न गुरिल्ला-450 या वाहनाद्वारे केला आहे.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.