सलील कुलकर्णी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. लाइव्ह कॉन्सर्ट आणि लाइव्ह कॉन्सर्टच्या नावाखाली प्रेक्षकांची केली जाणारी फसवणूक यावर त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. याची पोस्ट त्यांनी व्हायरल केली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिली आहे. काय़ म्हणाले सलील कुलकर्णी जाणून घेऊया.
पोस्टमध्ये सलील कुलकर्णी यांनी लिहिलं की, “लाइव्ह कॉन्सर्ट जाहीर करून रेकॉर्ड लावून लिप सिंक करणे म्हणजे जॉगिंगसाठी निघून कॅब करण्यासारखं आहे. सगळ्यांचीच फसवणूक…” यासोबतच त्यांनी निरीक्षणे हा हॅशटॅगही वापरला आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी त्यांच्याशी सहमत असल्याचं सांगितलं.
एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “आम्ही तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहोत.” तर काहींनी त्यांना आलेले असे अनुभवही कमेंट्स करत शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हिंदीमध्ये असे प्रकार सर्रास होतात.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “कटू सत्य.”